spot_img
ब्रेकिंग...तर सरकारी अधिकाऱ्यांना दररोज होणार १ हजार रुपयांचा दंड?, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

…तर सरकारी अधिकाऱ्यांना दररोज होणार १ हजार रुपयांचा दंड?, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
आपले सरकार पोर्टलवर अधिसूचित सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दरदिवशी १००० रुपयांचा दंड लावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आता आपले सरकार पोर्टलवरून सेवा उपलब्ध करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कोणतीही दिरंगाई होणार नाही.

राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमांतर्गत १०२७ सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी ५२७ सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध आहेत. प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात. यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखाला दरदिवशी १००० हजार रुपयांचा दंड लावण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात विविध सामाजिक क्षेत्रांची वॉररुम बैठक पार पडली. या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, आपले सरकार पोर्टलवरील अधिसूचित सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन, अ‍ॅग्रीस्टॅक उपक्रम यांचा आढावा घेण्यात आला.

आपले सरकार पोर्टलवर विविध विभागांच्या १३८ इंटिग्रेटेड सेवा ३१ मे २०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच उर्वरित ३०६ अधिसूचित सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन कराव्यात. याप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्यास दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दरदिवशी १ हजार रुपयांचा दंड लावण्याची कारवाई करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यानी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...