अहमदनगर | नगर सह्याद्री
गेल्या पाच वर्षात खा. सुजय विखे यांनी कोट्यावधी रुपयांचे विकास कामे करून मतदारसंघाच्या विकासात मोठी भर घातली आहे. केलेल्या विकासकामांमुळे याही निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे असे मत अॅड. शहर उपाध्यक्ष धनंजय जाधव यांनी केले. दरम्यान, नगर शहरासह मतदारसंघातील सर्व गावांमध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी रविवारी सायंकाळी नगर शहर भाजपच्या वतीने शहर उपाध्यक्ष अॅड.धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली बागडपट्टी, तोफखाना, चितळे रोड परिसरातून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर, शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आदींसह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
अॅड. अभय आगरकर म्हणाले, नगर शहरातील मध्य भाग हा भाजपचा बालेकिल्ला आहे. प्रत्येक निवडणुकीत या भागातून भाजपला मताधिय मिळाले आहे. ही लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्यावर लढत आहे. त्यामुळे याही निवडणुकीत नगर शहरातील नागरिक भाजपच्याच उमेदवाराला विजयी करतील.
यावेळी माजी उपमहापौर मालन ढोणे, राजूमामा जाधव, सुरेखा विद्ये, आनंदा शेळके, प्रशांत मुथा, प्रिया जानवे, बाबासाहेब सानप, तुषार पोटे, प्रदीप परदेशी, पोपट पाथरे, सागर भोपे, कालिंदी केसकर, पंडित वाघमारे, प्रवीण ढोणे, मयूर बोचुघोळ, चेतन जग्गी, सोमनाथ जाधव, बाळासाहेब भुजबळ, स्वप्निल बेद्रे, राहुल मुथा, श्वेता झोंड, अजय ढोणे, अभिजीत ढोणे, बंटी डापसे, देहेरेकर, गोपाल वर्मा, अनिल निकम, कावेरी घोरपडे, विकास घोरपडे, राजू वाडेकर, लक्ष्मीकांत तिवारी, राजू विद्ये, राजू बोगा, संध्या पावसे, राखी आहेर, ज्योती दांडगे, सुरेखा जंगम, किरण गोंधळे, संतोष उदगीरकर, श्रीकांत रामगिरी, अभिजित गोंधळे, समर्थ शिवरात्रीआदींसह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.