spot_img
अहमदनगर..म्हणुन सर्वच पक्ष सावध! विधान परिषद निवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; पडद्यामागे नेमकं घडतंय...

..म्हणुन सर्वच पक्ष सावध! विधान परिषद निवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; पडद्यामागे नेमकं घडतंय काय?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जोरदार हालचाली पडद्यामागे सुरु झाल्या होत्या. बंडखोरी आणि क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुरु आहेत.

आतापर्यंत दोन्ही आघाडी आणि युतीने मिळून ११ उमेदवार जाहीर केले आहे. १२ वा उमेदवार कोणी देणार नाही, असा प्रयत्न केला जात आहे. यामुळे या सर्व जागा बिनविरोध निवडून येणार आहेत. त्यात सर्वाधिक पाच उमेदवार भाजपचे आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार जाहीर केले आहे. शिवसेने ठाकरे गट उमेदवार देणार आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

विधानसभेतील सर्वांधिक सदस्य संख्या असलेला भाजप सर्वांधिक ५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यानुसार भाजपाने ५ उमेदवार उमेदवार जाहीर केले आहे. त्यानंतर महायुतीमधील सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी २ जागा मिळणार आहेत. त्यामुळे उरलेल्या २ जागांवर महाविकास आघाडी त्यांचे उमेदवार देणार आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे तीन पक्ष आहेत. आता त्यांच्यामधून कोण २ उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाकडे त्यांची एक जागा निवडून आणण्यासाठी पुरेसे आमदारांचे संख्याबळ आहे. मात्र ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यापैकी कोणता पक्ष उमेदवार उभा करणार? आणि जर का महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिला तर मग विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असणार आहे. त्यामुळे निवडणूक होणार आहे. परंतु विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांचे एकमत झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...