अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर धारदार शस्राने वारकरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर शहरातील नालेगावात घडली. अरुण रखामाजी कदम (वय-39 वर्षे रा नालेगाव ता.जि. अहिल्यानगर ) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल उर्फ काळ्या कदम ( रा. नेप्ती ता. नगर ) यांचेसह दोन अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार (दि. २४) रोजी रात्री साडेसातच्या सुमारास फिर्यादी अरुण कदम घरासमोर उभे असताना गणेश उर्फ बजरंग अबाजी चितळे मला मारले म्हणत ओरडत आला. काय झाले असे विचारले असता त्यांने विशाल कदमने मारहाण केली असल्याचे सांगितले.
फिर्यादी यांनी विशाल कदम यांचेकडे याबाबत विचारपूस करत असताना एका इलेक्ट्रीक मोटर साईकलवरील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीना शिवीगाळ करत कोण विशाल कदमला नडतो असे बोलत धारदार शस्राने वार केले. फिर्यादी अरुण कदम हल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.