Water update: रखरखता उन्हाळ्याचे दिवस कसे सरणार, या चिंतेत आनेक नागरिक पडले असून त्याचे लक्ष हवामान विभागाच्या पावसाच्या आगमनाच्या अंदाजाकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘स्कायमेट’ या संस्थेने आपला अंदाज देत यंदा समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान अंदाज एजन्सी ‘स्कायमेट’ ने आज मंगळवार दि. ९ एप्रिल रोजी मान्सूनचा अंदाज जाहीर केला. ‘अल निनो’ सक्रिय असून, एप्रिल किंवा मेदरम्यान ही सक्रियता कमी होऊन तटस्थ (एन्सो) स्थिती निर्माण होऊ शकते.
ही स्थितीही पावसासाठी चांगली असते. त्यानंतर जून ते सप्टेंबर या कालावधीत ‘ला निना’ सक्रिय असेल. ‘ला निना’चा पावसाळ्याच्या उत्तरार्धात अधिक प्रभाव वाढेल, या पार्श्वभूमीवर यंदाचा पावसाळा समाधानकारक असेल, अशी माहिती ‘स्कायमेट’ दिली.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, देशाच्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात चांगला पाऊस अपेक्षित आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही पुरेसा पाऊस होऊ शकतो.
बिहार, झारखंड, ओडिशा आणि बंगालमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसात किंचित घट होण्याची शक्यता आहे. जुलै आणि ऑगस्ट हे मान्सूनचे सर्वात सक्रिय कालावधी आहेत. ईशान्य भारतात सुरुवातीच्या पावसाळ्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.