spot_img
अहमदनगरबनावट प्रमाणपत्र तयार करून साडे सोळा लाख रुपये लाटले, नगरमध्ये घडला प्रकार

बनावट प्रमाणपत्र तयार करून साडे सोळा लाख रुपये लाटले, नगरमध्ये घडला प्रकार

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

शहरातील एका चार्टर्ड अकाउंटंटच्या सही व शिक्क्यांचा वापर करून बनावट प्रमाणपत्र तयार करून १६ लाख ८१ हजार २९९ रुपये लाटल्याची घटना उघडकीस आली आहे. ३१ मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२३ या काळात ही घटना घडली आहे. या प्रकरणी चार्टर्ड अकाउंटंट देवेंद्र आण्णासाहेब पाटील (वय ३०, रा. प्लॅट नंबर ४६ ओम शांती, नंदनवन कॉलनी, गुलमोहर रोड, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅस कन्सल्टंट सचिन आप्पासाहेब दुधाडे (वय २९, रा. महेश्वरी पार्क भिस्तबाग चौक, पाईपलाईन रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चार्टर्ड अकाउंटंट देवेंद्र पाटील यांचा डी.ए.पाटील अ‍ॅण्ड असोसिएट या नावाने चाणय चौक, साई सोना पॅरेडाईज, बुरुडगाव रोड येथे व्यवसाय आहे.

दुधाडे याने त्यांच्या नावाचा, सही व शियांचा वापर करुन बनावट प्रमाणपत्र तयार करून राजेश बाळासाहेब भोसले, तसेच किशोर बाळासाहेब पाटील यांचे इनकम टॅस, जीएसटी बिलाचा परतावा भरण्यासाठी त्यांच्याकडून ३१ मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत वेळोवेळी १६ लाख ८१ हजार २९९ रुपये चेकद्वारे घेतले. सदरचे चेक हे त्याच्या बैंक ऑफ बडोदा बँकेतील एस.डी. असोसिएट या खात्यात वटवून सदर रक्कम वैयक्तीक कारणासाठी वापरली. त्याने आणखी काही जणांना बनावट प्रमाणपत्र बनवून दिले असल्याची शंका असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोहेकॉ डाके करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात मोठे मंत्री हनी ट्रॅपमध्ये, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणाने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात...

भयंकर! शॉपिंग मॉलला भीषण आग, 60 जणांचा मृत्यू; अनेक जण जिवंत जळाले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - इराकमध्ये शॉपिंग मॉलला भीषण आग लागली. या आगीमध्ये लहान...

संदीप थोरात आणखी गोत्यात; ठेवीदारांचा आक्रमक पवित्रा, पत्रकार परिषदेत मोठी माहिती उजेडात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री क्लासिक ब्रीज, मनीमॅक्सच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्यानंतर सह्याद्री मल्टीसिटी निधी लि....

डांगे आयुक्त आहेत की भ्रष्टाचाऱ्यांचे प्रवक्ते?; किरण काळे यांचा सवाल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मनपातील 776 रस्त्यांच्या कामात झालेल्या सुमारे 350 ते 400 कोटींच्या महाघोटाळ्याच्या...