Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या अफाट संपत्तीचा तपशील आता समोर आला आहे. विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीत कोट्यवधींच्या मालमत्तांची माहिती हाती लागली आहे. शेती, प्लॉट, गाळे, स्टोन क्रशर युनिट आणि अनेक कोटींच्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टीचा समावेश असलेल्या या मालमत्तांची यादी समोर आली आहे. SIT ने ही संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
SIT च्या अहवालानुसार, 2020 ते 2024 दरम्यान वाल्मिक कराड आणि त्याच्या कुटुंबाने विविध ठिकाणी जमीन, गाळे आणि स्टोन क्रशर खरेदी केले. तसेच, काही मालमत्तांचे गहाणखतही करण्यात आले आहे. केज शहर – 2500 चौरस फूट क्षेत्रातील आरसीसी बांधकाम (1.69 कोटींना खरेदी – 29 नोव्हेंबर 2024), दगडवाडी शेतजमीन – (48.26 लाख – 31 जानेवारी 2020), मौजे तडोळी जमीन – 12 हेक्टर (5.84 लाख – 10 जानेवारी 2023), परळी वैजनाथ तालुका जमीन – 3 हेक्टर 11 आर (25.35 लाख – 8 जुलै 2024) आहे.
गहाणखत ठेवलेल्या प्रॉपर्टी- धाराशिव जनता सहकारी बँक (13 डिसेंबर 2023) – 5 कोटी 50 लाखांसाठी काही मालमत्तांचा गहाणखत, रेसिडेन्शियल प्रॉपर्टीअंबाजोगाई रोड, परळी, ओपन लँड प्रॉपर्टी – पांगरी, बीड. वाल्मिक कराडच्या पत्नी आणि मुलाच्या नावावर संपत्ती- पत्नी मंजिरी कराड – वडगाव, परळी येथे जमीन (13.15 लाख – 11 जुलै 2024), मुलगा श्री गणेश कराड – शिरसाळा गावातील प्लॉट (7.40 लाख – 3 जानेवारी 2023) वाल्मिक कराड याच्या संपत्तीची सखोल चौकशी सुरू असून, ही संपत्ती जप्त करण्यासाठी SIT ने न्यायालयात अर्ज केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मालमत्ता एका माणसाकडे जमा झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.