spot_img
ब्रेकिंगसाहेब! सांगा कचरा टाकू कुठे? 'या' भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना स्वतःचा घरगुती कचरा दिवसेंदिवस साठवून ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. रस्त्यांवर मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले असून त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण झाली आहे. मनपा आयुक्त यांनी पाईपलाईन रोड व पद्मानगर परिसराची पाहणी केली. त्या दरम्यान नागरिकांनी थेट प्रश्नांचा भडिमार केला. विशेषतः महिलांनी आयुक्त साहेब, कचरा टाकू तरी कुठे? असा थेट सवाल करत प्रशासनाची झोप उडवली.

या परिसरातील रहिवाशांच्या मते, मागील अनेक दिवसांपासून कचरा उचलण्याची कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अस्वच्छतेमुळे मोकाट कुत्र्यांचा त्रास, डासांचे प्रमाण आणि दुर्गंधी यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. याचा परिणाम लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्ती यांच्या आरोग्यावर होत आहे. माजी नगरसेवक निखिल वारे यांनी मागील आठवड्यात कचरा संकलनाबाबत आवाज उठविला.

महापालिकेने गेल्या तीन महिन्यांपासूनचा कचरा संकलन कर घेऊ नये. कारण महापालिकेकडून कचऱ्याच्या संदर्भात कुठल्या ही सुविधा मिळत नाहीत.लवकरात लवकर महापालिकेने स्वच्छतेसंबंधी ठोस पावले उचलावीत. दररोज नागरिकांच्या घरोघरी जाऊन घंटागाडी द्वारे कचऱ्याचे संकलन करावे. महानगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन, कचरा संकलन व विल्हेवाट व्यवस्था तातडीने पूर्ववत करावी. अशी मागणी आयक्त डांगे यांच्याकडे करण्यात आली.

‌‘नवीन एजन्सीकडे कचरा संकलनाची जबाबदारी देऊ‌’
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, शहरातील कचरा संकलन व्यवस्थेतील अडचणींची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. सध्या कार्यरत असलेल्या कचरा संकलन एजन्सीच्या कार्यक्षमतेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे की, ही एजन्सी हटवून नव्या एजन्सीकडे कचरा संकलनाची जबाबदारी सोपवली जाईल. नवीन एजन्सीसोबत कामकाजाचा आराखडा अंतिम टप्प्यात असून, लवकरच शहरात नियमित, वेळेवर आणि यंत्रबद्ध कचरा संकलन सुरू होईल. नागरिकांनी पालिकेवर विश्वास ठेवावा, आम्ही लवकरच समाधानकारक बदल करून दाखवू असे प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २६ गोवंशीय जनावरांची सुटका

कर्जत। नगर सह्याद्री राशीन (ता. कर्जत) येथील आळसुंदा येथे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने डांबून ठेवलेली...