अहमदनगर । नगर सहयाद्री
तलाठी भरती घोटाळ्यावरून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करताना आमदार रोहित पवार यांनी त्यांना गोपनीय फाईल उघड करण्याचे आव्हान दिले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये तलाठी नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचे सांगितले होते. परंतु, बाळासाहेब थोरात आणि रोहित पवार यांनी या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता.
विखे पाटलांनी भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेण्याचे आव्हान दिल्यानंतर रोहित पवार यांनी ट्विटरवरून विखे पाटलांना प्रतिआव्हान दिले आहे. पवारांनी म्हटले आहे की त्यांनी विखे पाटलांना गोपनीय फाईल DM केली आहे, ज्यामध्ये भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट आहे.
पवारांनी केलेलया ट्विटमध्ये म्हंटल आहे की, “साहेब, भरती प्रक्रियेसंदर्भात आपणास एक गोपनीय PDF फाईल DM केली आहे. आपल्याच अधिकाऱ्यांनी हा गोपनीय अहवाल सरकारला पाठवला होता, ज्यावर आपल्या सरकारने काहीही कार्यवाही केली नाही. मला हा अहवाल कसा मिळाला हे विचारू नका, कारण सरकारी यंत्रणेतही अनेक अधिकारी पारदर्शक यंत्रणेसाठी प्रयत्नशील असतात.” असो! असे म्हंटले आहे.
https://x.com/RRPSpeaks/status/1819966790002245871