अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ०५ यावेळेत वीज पुरवठा बंद राहणार असून, या कालावधीत मनपाकडूनही पाणी योजनेची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास एक दिवस उशिराने पाणी पुरवठा होणार आहे.
शनिवार (७ डिसेंबर) बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारस नगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर या भागास सकाळी ११ नंतर पाणी पुरवठा होणार नाही. या भागास रविवारी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
रविवारी (८ डिसेंबर) पाणी वाटप असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायकनगर या भागात रविवार ऐवजी सोमवारी पाणी सोडण्यात येणार आहे.
सोमवारी (९ डिसेंबर) पाणी पुरवठा होवू घातलेल्या सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, व सावेडी या भागात मंगळवारी (१० डिसेंबर) पाणी सोडण्यात येणार आहे.