spot_img
ब्रेकिंगश्रीरामपुर हादरले! अल्पवयीन मुलावर गोळीबार, कारण काय?

श्रीरामपुर हादरले! अल्पवयीन मुलावर गोळीबार, कारण काय?

spot_img

श्रीरामपूर । नगर सहयाद्री:-
श्रीरामपूर शहरात अल्पवयीन मुलावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. शहरातील सूतगिरणी- दिघी रस्त्यावर, रेल्वे गेटजवळच सदरचा प्रकार घडला. महाविद्यालयात झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने गावठी कट्ट्यातून दोघांवर दोन गोळ्या झाडल्या. त्यात एक जखमी झाला तर दुसरा बचावला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मुलाची आत्या ही अंगणवाडी (भैरवनाथनगर, श्रीरामपूर) येथे तीचे नविन घर बांधत आहे. त्या घराला पाणी मारण्यासाठी फिर्यादी, त्याचा भाऊ व अन्य एक (सर्व अल्पवयीन) हे आत्याच्या नवीन घरासमोरील दिघी गावाकडे जाणार्‍या रस्त्यालगत थांबले होते. दरम्यान, फिर्यादीच्या ओळखीचा अल्पवयीन मुलगा समोरुन काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आला. फिर्यादीच्या भावाला अल्पवयीन मुलाने महाविद्यालयात झालेल्या मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर स्वतःच्या कमरेला लपवलेली पिस्तुल बाहेर काढून फिर्यादीच्या भावावर गोळ्या फायर केल्या.

त्यामुळे फिर्यादी घाबरुन गाडीवरुन उतरुन पळाला. त्यानंतर फिर्यादीच्या दिशेने त्या अल्पवयीन मुलाने दुसरी गोळी झाडली. परंत फिर्यादीने ती गोळी हुकवली, तीच गोळी फिर्यादीच्या गाडीच्या खोपडीत घुसली. आजुबाजुच्या लोकांचा आरडाओरडा ऐकुन आरोपी अल्पवयीन मुलगा हा त्याच्या मोटरसायकलवरून रेल्वेगेट, सुतगिरणीच्या दिशेने पसार झाला. जखमी मुलास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...