श्रीरामपूर / नगर सह्याद्री
नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शहरात उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. नगराध्यक्षपदासाठी आणखी चार तर नगरसेवकपदासाठी दहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले.
नगराध्यक्षपदासाठी शिवसेना नेते संजय छल्लारे, अशोक थोरे, तसेच निलेश भालेराव आणि जोएफ शेख या चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. याचबरोबर वेगवेगळ्या प्रभागांमधून नगरसेवकपदासाठीही दहा उमेदवारांनी अर्ज सादर केले.
नगरसेवक पदासाठी यांनी केले अर्ज सादर
रोहित शिंदे (प्रभाग २), जावेद पठाण (प्रभाग २), रवींद्र खिल्लारी (प्रभाग १०), (प्रभाग १५), दिपाली मोरगे (प्रभाग १५) वसंत कोल्हे (प्रभाग १ व २), वैशाली पोटे (प्रभाग १०),प्रसाद चौधरी (प्रभाग ११), स्नेहल खोरे (प्रभाग १७), निलोफर शेख (प्रभाग ९) , प्रकाश अहिरे (प्रभाग १५)
नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच तर नगरसेवकपदासाठी अकरा उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.



