spot_img
ब्रेकिंगमाफीवीरांना घरचा रस्ता दाखवा; शरद पवारांचा हल्लाबोल!

माफीवीरांना घरचा रस्ता दाखवा; शरद पवारांचा हल्लाबोल!

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. त्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे रविवारी राज्यभर आंदोलन केले. मुंबईत झालेल्या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

मालवणमधील शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा म्हणजे महायुती सरकारचा भ्रष्टाचाराचा नमूना असल्याचा हल्ला शरद पवार यांनी केला. महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाऱ्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे धक्कादायक विधान केले.

राज्यभरात असलेले शिवाजी महाराजांचे पुतळे लोकांना प्रेरणा देत असतात. परंतु मालवणमध्ये उभा केलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमूना आहे. तो पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे. हा जनमानसात समज निर्माण झाला आहे. हा शिवप्रेमी लोकांचा अपमान करण्यात आला. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करण्याची भूमिका घेतली, असे शरद पवार यांनी म्हटले.

राज्यात देशात शिवद्रोही सरकार आहे. महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू आहे. कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार केला. महाराजांचा अपमान करण्याचं काम सरकारने केलं. मालवणमध्ये महाराजांचा पुतळ पडला. तो फक्त महाराजांचा पुतळा नव्हता, तर महाराष्ट्राचा धर्म होता. शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. महाराजांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

शरद पवार तब्येत बरी नसतानाही आले आहे. वयाचे बंधन न ठेवता महाराजांच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी शाहू महाराज आणि शरद पवार आले आहेत. मोदींनी माफी मागितली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली तरी आम्ही राजकारण करत असल्याचं सांगितलं जात आहे.

ज्या दिवशी महाराजांचा अपमान झाला, तेव्हाच राज्यातील जनतेने शिवाजी महाराजांची माफी मागितल. आम्ही शिवद्रोही सरकार चुकून निवडून दिलं, खोके सरकार निवडून दिलं याची माफी जनतेने मागितली आहे. आम्ही पुन्हा हे सरकार राज्यात येऊ देणार नाही अशी शपथ जनतेने घेतली आहे.

जे माफीवीर लोकं आहेत, मोदी असो की शिंदे असो हे केवळ निवडणुकीसाठी माफी मागत आहेत. या माफीवीरांना घरचा रस्ता दाखवायचा आहे. हा फुले शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र घडवायचा आहे. आपल्याला या शिवद्रोही सरकारला चलेजावचा नारा देणार आहोत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“‘मत चोरी’तून सत्तेत आलेल्या सरकारची ‘जमीन चोरी’ ; राहुल गांधींचा मोदी, फडणवीसांवर निशाणा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे पार्थ पवार आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले...

पतीच्या अपहरणाचा कट; पोलिसांनी केला भांडाफोड, फिर्यादीच निघाला आरोपी..

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री ​भलत्याच व्यक्तींना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या पतीच्या अपहरणाचा खोटा...

खळबळजनक! हत्येच्या कटात मुंडेंचा हात; मुंडे म्हणाले त्यांची आणि माझी

बीड / नगर सह्याद्री : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा...

नगरमध्ये तरुणाच्या घरासमोर तिघांचा पहाटे राडा, मोटारसायकलींची तोडफोड, काय घडलं पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ​"तो जर आम्हांला दिसला तर आम्ही त्याला जिवे ठार...