spot_img
अहमदनगरदोन गटात राडा! अहमदनगर मधील घटना

दोन गटात राडा! अहमदनगर मधील घटना

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगर तालुक्यातील बहिरवाडी शिवारात किरकोळ कारणातून दोन गटांत वाद होऊन हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिदास भाऊसाहेब तोडमल (वय २७ रा. जेऊर बायजाबाई ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमर जगन्नाथ दारकुंडे, अमोल जगन्नाथ दारकुंडे, अमोलचा भाऊ (नाव नाही) व वैष्णव देविदास काळे (सर्व रा. बहिरवाडी ता. नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी (१७ ऑगस्ट) रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी हे बहिरवाडी शिवारातील तुकाई माता मंदिराच्या पार्किंगमध्ये वाहन पार्क करत असताना अमर दारकुंडे तेथे आला. वाहनाच्या टायरने खडा उडून लागला म्हणून त्याने इतर तिघांच्या मदतीने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. टोकदार वस्तूने वार करून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या फिर्यादीच्या आई- वडिलांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

दुसऱ्या गटाचे अमर जगन्नाथ दारकुंडे (वय ३३.बहिरवाडी, जेऊर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहिदास भाऊसाहेब तोडमल, राजेंद्र भाऊसाहेब तोडमल, भाऊसाहेब तुकाराम तोडमल व तेजल राजेंद्र तोडमल (सर्व रा. तोडमलवाडी, जेऊर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी साडेदहाच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरासमोर असताना रोहिदास, राजेंद्र, भाऊसाहेब व तेजल तेथे आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांचा भाऊ व भावजई भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता त्यांना देखील मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभा निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Manoj Jarange Patil News : अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला...

तुमचे व्हॉट्सॲप कुठे कुठे आहे चालू? या युक्तीने कळेल क्षणार्धात

नगर सहयाद्री वेब टीम :- WhatsApp हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे, जे प्रत्येकजण...

महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजणार; लवकरच मोठा निर्णय होणार?

Politics News: राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला धूर चारत पुन्हा...

राज्याला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; रोहित पाटलांचा दणदणीत विजय

Politics News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती...