spot_img
अहमदनगरनीलक्रांती चौकात राडा! कारण आलं समोर? वाचा सविस्तर..

नीलक्रांती चौकात राडा! कारण आलं समोर? वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नीलक्रांती चौकाजवळ असलेल्या पान टपरीवर किरकोळ वादातून सशस्त्र हाणामारी झाल्याची समोर आणली. या राड्यात तिघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोघांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षद अशोक भोसले (वय २६, रा.निलक्रांती चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज साळवे (रा. सर्जेपुरा) व सनी काते (रा. सावेडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्र कश्यप साळवे सोबत कॅफे किंग समोरील हनुमान पान टपरीसमोर मावा घेत असताना बाजूला सरक असे म्हटल्याचा राग आल्याने दोघांनी शिवीगाळ करून लाथाबुयांनी मारहाण केली.

जिवे मारण्याचे उद्देशाने धारदार शस्त्राने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.सनी अनिल काते (वय २४, रा. सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्षद अशोक भोसले, कश्यप साळवे (दोघे रा. निलक्रांती चौक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज हरिभाऊ साळवे (वय २४) याच्या समवेत निलक्रांती चौकात हनुमान पान स्टॉल येथे पान खाण्यास गेले असताना दोघांनी शिवीगाळ करून आम्हा दोघांवर धारदार वस्तूने छातीवर, पोटावर, दंडावर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...