spot_img
ब्रेकिंगआता ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषी मंत्र्यांचे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे..

आता ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषी मंत्र्यांचे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे..

spot_img

Manikrao Kokate: कृषीमंत्री माणिकराव काकोटा यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलेय. हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं वादग्रस्त वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेय. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करायला गेले होते. त्यावेळी कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेय. यामुळे आता विरोधकांकडून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जाईल.

अवकाळी पावसाने नाशिकमधील कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कृषी मंत्र्यांचे हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे ठरलेय. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

शेतात असलेले कांद्याचेच फक्त पंचनामे होणार, घरात असलेल्या कांद्याचे होणार नाहीत, ते नियमात बसत नाही. उभ्या पिकांचे रीत सर पंचनामे होतील, असेही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. माणिकराव कोकाटे आज नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोहचले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलेय.

मागील आठवडाभरात महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतात असणारे पिके सडली गेली. कांदा, आंबा भुईमुंगाच्या शेंगासह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आळेला घास पावसामुळे हिरावला गेल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. फडणवीस सरकारकडून नुकसान झालेल्यांना भरपाई मिळेल, अशी घोषणा करण्यात आली. लवकरच नुकसानीचे पंचनामे केले जातील, पण त्याआधीच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानामुळे वाद उफाळलाय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी ‘उडान प्रकल्प’चा निर्धार

पारनेर तालुक्यात कार्यशाळा; १५ ऑगस्टला 'बालविवाहमुक्त गाव' ठराव संमत होणार पारनेर । नगर सहयाद्री बालविवाहासारख्या...

अहिल्यानगर जिल्ह्यात गांजाची लागवड; आरोपीला ठोकल्या बेड्या..

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- भानगाव शिवार (ता. श्रीगोंदा) येथील एका शेतकऱ्याने घरासमोर गांजाची लागवड केल्याची...

अहिल्यानगर: शिक्षक बनला भक्षक! जिल्हा परिषद शाळेत चिमकुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणार्‍या परप्रांतीय...

पोलीस दलात मोठे फेरबदल; अमोल भारती शिर्डीचे उपअधीक्षक, अहिल्यानगरला…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री राज्य शासनाच्या गृह विभागाने केलेल्या बदल्यामध्ये अहिल्यानगर शहर, श्रीरामपूर व...