spot_img
ब्रेकिंगउड्डाणपुलावर गोळीबार! सराईत गुन्हेगार 'शाहरूख' शेख 'फॉरच्युनर' सह जेरबंद

उड्डाणपुलावर गोळीबार! सराईत गुन्हेगार ‘शाहरूख’ शेख ‘फॉरच्युनर’ सह जेरबंद

spot_img

श्रीरामपूर । नगर सहयाद्री:-
श्रीरामपूर तालुक्यातील सराईत गुन्हेगारास गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. शाहरूख रज्जाक शेख ( वय 32, रा. खैरी, ता.श्रीरामपूर) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतुस, एक टोयोटा कंपनीची फॉरच्युनर, एक मोबाईल असा एकुण १० लाख ७४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. नमुद आदेशानुसार पो. नि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/ हेमंत थोरात, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, बाळासाहेब खेडकर, सागर ससाणे, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड व महादेव भांड यांना अवैध धंदयाची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

पथकाला गुप्त बातमीदारामार्फत सराईत गुन्हेगार शाहरूख शेख फॉर्चुनर गाडी क्रमांक ( एम-04-एफ-4771) मधुन बेलापूर येथुन टिळकनगर, श्रीरामपूर येथे गावठी कट्टासह येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने मिळालेल्या माहितीवरून बेलापूर ते टिळकनगर रोडवरील कुऱ्हे वस्तीजवळ सापळा रचून सराईत गुन्हेगार शाहरूख शेखला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतुस आढळले. आरोपीस अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने तीन महिन्यापुर्वी अशोकनगरकडे जाणारे उड्डाणपुलावर एक इसमावर गावठी कट्टातुन गोळीबार केला असल्याची कबुली दिली आहे.

सराईत गुन्हेगार शाहरूख शेखच्या विरोधात श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी नारायण गाव जि.पुणे पोलिसात प्राणघातक हल्ला, जबरी चोरी, लूटमार, चोरी, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे यासारखे १० गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने बजावली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...