मुंबई। नगर सहयाद्री-
शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या आहे. दाखल केलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल तयार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली असून १० जानेवारी पर्यंत ऐतिहासिक निकाल समोर येणार आहे.
शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी काहीच दिवसांपूर्वी पूर्ण झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दोन्ही गटांच्या वकिलांना समोरा-समोर बोलावून हा निकाल जाहीर करणार आहे.
विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकालाचा मसुदा दिल्लीला कायदेशीर अभिप्रायासाठी तज्ज्ञांकडे पाठवला आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणात काय निकाल येणार?शिंदे (गट) की ठाकरे (गट) , नेमका कुणाला दिलासा मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे
शिंदे गटाला मिळणार दिलासा?
निवडणूक आयोगाने बहुतमताच्या आधारे शिंदे गटाला शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दिलं होतं. आता विधानसभा अध्यक्षांनी देखील याच मुद्द्याचा आधार आमदार अपात्रता प्रकरणात घेतला असल्याचं समोर आले आहे. शिंदे गटाने शिवसेना एकच आहे, फक्त आम्ही शिवसेनेच्या नेतृत्वात बदल केल्याचा दावा केला होता. या मुद्द्यांचा आधारे शिंदे गटाला दिलासा मिळू शकतो.



