spot_img
अहमदनगरधक्कादायक! खेळता खेळता बालक हौदात पडले, पुढे नको तेच घडले..

धक्कादायक! खेळता खेळता बालक हौदात पडले, पुढे नको तेच घडले..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
पाण्याच्या हौदात बुडून पडून चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना भिंगार परिसरात घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केतन सिध्दार्थ भिंगारदिवे (वय ४ रा. घासगल्ली, भिंगार) असे मयत बालकाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी: भिंगारच्या घासगल्ली भागात भिंगारदिवे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या घरासमोरच पाण्यासाठी हौद केलेला होता. बुधवारी दि.१० एप्रिल रोजी सकाळी केतन हा घरासमोर खेळत असताना हौदात पडला. त्यामध्ये पाणी असल्याने त्याच्या नाका-तोंडात पाणी गेले.

याची माहित कुटुंबातील व्यक्तींना मिळताच त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला हौदाच्या बाहेर काढले. उपचारासाठी तात्काळ शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी केतनवर उपचार करण्यापूर्वीच त्याला मृत घोषीत केले.

तशी माहिती रूग्णालय प्रशासनाने भिंगार कॅम्प पोलिसांना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान चार वर्षीय बालकाचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाल्याने भिंगार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर रेल्वेस्थानक, रेल्वेस्टेशनचेही नाव बदलले, सरकारकडून प्रक्रिया पूर्ण

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरचे नामांतर केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाच्या नामांतराचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे....

तयारीला लागा! जिल्हा परिषद अध्यक्ष पदांच्या आरक्षणाचा फुगा फुटला, अनेक दिग्गजांना मोठा धक्का, कुठे काय निघाले आरक्षण पहा

अहिल्यानगर झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव / जिल्ह्यातील दिग्गजांना मोठा धक्का | राज्यातील...

एसईबीसी, ईडब्लूएस, ओपन आरक्षण नको का?; मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले पहा

मराठा समाजाला सवाल | नेत्यांनाही धरले धारेवर नाशिक | नगर सह्याद्री राज्यातील मराठा समाजाला आतापर्यंत त्यांच्यासाठी...

धक्कादायक! हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी, दिल्ली, मुंबईत खळबळ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था दिल्लीतील नामांकित शाळा बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी ताजी असतानाच आता...