अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विळद घाटातील विखे पाटील मेडिकल कॉलेजमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्यास चौघांनी दगडाने मारहाण केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री वैष्णवी इलेक्ट्रीक दुकानजवळ दुध डेअरी चौक येथे घडली.
या प्रकरणी जखमी पांडुरंग भानुदास भगत (वय ५०, रा.शेंडी बायपास रोड, एमआयडीसी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत गायकवाड, काजल भरत गायकवाड (रा. दत्त मंदिराजवळ डोंगरे वस्ती, ता. अहिल्यानगर) व त्यांचे दोन अनोळखी सहकारी अशा चार जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ड्युटीवरून वैष्णवी इलेक्ट्रीक दुकान येथून घरी जात असताना संशयित आरोपींनी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असताना तुम्ही खुप त्रास दिला, वेगवेगळ्य ड्युटी लाऊन कामावरून काढले, असे म्हणत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोहेकॉ साबीर शेख करीत आहेत.