spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! खेळणे देण्याच्या बहाण्याने घरी नेत अत्याचार; आरडाओरड केल्याने सहाव्या मजल्यावरून फेकले

धक्कादायक! खेळणे देण्याच्या बहाण्याने घरी नेत अत्याचार; आरडाओरड केल्याने सहाव्या मजल्यावरून फेकले

spot_img

ठाणे / नगर सह्याद्री –
राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. अशातच एका तरुणाने अल्पवयीन मुलीला खेळणे देण्याच्या बहाण्याने घरी नेट तिच्यावर अत्याचार केला. तो एवढ्यावर थांबला नाही तर अत्याचार केल्यानंतर मुलीला थेट सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना ठाण्याच्या मुंब्रा परिसरात समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

राज्यात मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एकट्या मुलीला साधत तिची छेड काढणे किंवा तिच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. अशीच घटना ठाण्याच्या मुंब्रा परिसरात समोर आली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मुली किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे.

सदर घटनेत एका वीस वर्षीय तरुणाने खेळणी देण्याचे आमिष दाखवून त्या अल्पवयीन मुलीला घरी नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या दरम्यान सदर मुलगी आरडाओरडा करू लागली. यामुळे घाबरलेल्या तरुणाने मुलीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यानंतर तिला थेट सहाव्या मजल्यावरून खाली फेकले; अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे.

ठाण्यातील मुंब्रा परिसरामध्ये अल्पवयीन मुलीला सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिले. मुंब्रा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लागलीच तपासाला सुरवात करत अत्याचार करणाऱ्या तरुणाला काही तासातच त्याच्या घरातून अटक केली. या प्रकरणी अधिक चौकशी केल्यानंतर तरुणाने कबुली दिली असल्याची माहिती मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...