spot_img
अहमदनगरधक्कादायक! नगर-पुणे महामार्गावर तिघांना मारहाण करून लुटले

धक्कादायक! नगर-पुणे महामार्गावर तिघांना मारहाण करून लुटले

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
नगर- पुणे महामार्गावरील चास (ता. नगर) शिवारात हॉटेल चुल मटन येथे जेवणासाठी थांबलेल्या नेवासा तालुक्यातील तिघांना मारहाण करून त्यांच्याकडील 15 हजाराची रोकड लुटली. मारहाणीत तिघे जखमी झाले आहे. रविवारी (10 नोव्हेंबर) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

डॉ. योगेश विजयकुमार झावरे (वय 30 रा. कारखाना पेट्रोल पंपासमोर, भेंडा फॅक्टरी, ता. नेवासा), अनिल गंगाराम सापते (वय 24) व सुनील काशीनाथ आडागळे (वय 30 दोघे रा. सौंदाळा, ता. नेवासा) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी डॉ. झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात प्रवीण फलके (पूर्ण नाव नाही) व त्याच्या सोबतच्या अनोळखी सहा जणांविरूध्द सोमवारी (11 नोव्हेंबर) दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास डॉ. झावरे, अनिल सापते व वाहन (एमएच 12 एक्सडब्ल्यू 0304) वरील चालक सुनील आडागळे हे तिघे चास शिवारातील हॉटेल चुल मटन येथे जेवण करण्यासाठी थांबले होते. त्यांनी त्यांच्याकडील वाहन हॉटेल चुल मटनच्या बोर्ड जवळ वॉचमनच्या सांगण्यावरून उभे केले होते.

दरम्यान, आडागळे हे वाहनातून खाली उतरत असताना हॉटेल चुल मटनच्या शेजारी असलेल्या हॉटेल जत्रा मधील प्रवीण फलके हा त्यांच्या जवळ आला व वाहन लावण्याच्या कारणावरून चालक आडागळे यांना शिवीगाळ केले. वाहनाचा दरवाजा जोरात ढकलून दिल्याने आडागळे यांच्या छातीला लागले. त्यानंतर डॉ. झावरे व सापते हे हॉटेल चुल मटनमध्ये गेले व काउंटर समोर असताना प्रवीण फलके व त्याच्या सोबत अनोळखी दोघांनी येऊन डॉ. झावरे व सापते यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्याच वेळी आडागळे हे वाहनाजवळ असताना हॉटेल जत्रामधून आलेल्या अनोळखी चौघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील 15 हजार रूपयाची रोकड बळजबरीने काढून घेतली. मारहाण करून ते सर्व जण तेथून निघून गेले.

जखमींनी येथील जिल्हा रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुफडासाफ करा, दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की,...

पारनेरमध्ये राजकीय भूकंप! सुजित झावरे पाटलांनी घेतला मोठा निर्णय

  सुजित झावरे पाटील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार पारनेर / नगर सह्याद्री - पारनेर...

अक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

अहिल्यानगर / नगर सह्याद्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत...

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...