यवतमाळ / नगर सह्याद्री –
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे. मुख्याध्यापिकेने तिच्या शिक्षक पतीला विष देऊन मारले. शंतनू देशमुख (32, रा. सुयोगनगर) यांचा मृतदेह जंगलामध्ये निर्जनस्थळी अर्धवट स्वरूपात जळाल्याचा आढळून आलं होतं, पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुख्यध्यापिकेने तीन विद्यार्थ्यांची मदत घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शंतनू अरविंद देशमुख (32, रा. सुयोगनगर) असं मृत पतीचं नाव आहे. तर निधी शंतनू देशमुख असं आरोपी पत्नीचं नाव आहे. दोघेही एकाच शाळेत शिकवत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या नवरा बायकोचं वारंवार भांडण होत असे, त्यातूनच निधीने आपला पती शंतनू याला संपवल्याची माहिती समोर आली आहे. 13-14 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास यवतमाळ शहरालगतच्या चौसाळा जंगलात 15 मे रोजी जळालेल्या अवस्थेत शंतनूचा मृतदेह आढळला होता. निधीने आपल्या पतीला विष देऊन आधी जीव घेतला होता. त्यानंतर तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चौसाळा येथील टेकडीवरती टाकला होता. त्यानंतर तिने आपल्या विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी मृतदेह पेटवून दिला. पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.
प्रेमविवाह असल्याने तो आई-वडिलांपासून विभक्त
शंतनू आणि निधी यांचा प्रेमविवाह असल्याने तो आई-वडिलांपासून विभक्त राहत होता. जंगलात मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच शंतनूसोबत दारू पिण्यासाठी बारमध्ये असणाऱ्या मित्रांमध्ये चर्चा सुरू झाली. पोलिसांनी या प्रकरणी मित्रांची चौकशी सुरू केली. त्यावेळी एकाच्या मोबाइलमध्ये शंतनूचा 13 मे रोजीचा फोटो दिसला त्या दिवसानंतर तो गायब झाला होता. त्याच्या अंगातील शर्ट आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा हे दोन्ही सारखेच होते. येथूनच पोलिसांची तपासाची दिशा ठरली
कशी पटली मृतदेहाची ओळख
अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या शरिरावरील शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन पुराव्यासाठी जप्त करण्यात आले होते. मृताची ओळख पटली नसल्याने पोलीस स्टेशन हद्दीत तसेच यवतमाळ जिल्ह्यातील तसेच आजुबाजुचे जिल्हे वाशीम वर्धा अमरावती ग्रामीण दाखल बेपत्ता लोकांची माहिती घेण्यात आली. यवतमाळ जिल्हयातील दाखल न झालेल्या बेपत्ता इसमांचा शोध घेतला असताना पोलिसांना माहिती मिळाली की, सनराईज स्कुल येथे कार्यरत शिक्षक शंतनु देशमुख हे मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यावरुन त्याचे मित्र मनोज झाडे, आनंद क्षिरसागर, राजेश ऊईके तसेच सुजीत भांदक्कर यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. यामध्ये शंतनु देशमुख हा दिनांक 13 मे पासून त्यांचे संपर्कात नसल्याचे सांगितले. 18 मे रोजी घटनास्थळावरुन जप्त अर्धवट जळालेल्या शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन हे शंतनु देशमुख याचे असल्याचे मित्रांनी ओळखले.
गुगलवरून तयार केले विष
शंतनू दारूच्या आहारी गेला होता. त्याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी निधीने हत्येचा कट रचला. तिने गुगलवर सर्च करून विषारी ज्यूस तयार केले. दारूच्या नशेत असलेल्या शंतनूला पाजले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. लग्नानंतर काही दिवस आयुष्य चांगले चालले, पण शंतनूला दारूचे व्यसन लागले. यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि निधी तिच्या पतीपासून सुटका मिळवण्याचा विचार करू लागली. शंतनू हा एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. तर त्याची पत्नी निधी देशमुख ही देखील त्याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती. या दोघांमध्ये प्रेम जुळलं. दरम्यान वर्षभरापूर्वी दोघांनी प्रेम विवाह केला. त्यानंतर ते आई वडिलांपासून दूर राहू लागले. गेल्या काही काळापासून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली होती. शंतनू दारू पिऊन निधीला त्रास होत होता. शंतनूच्या सततच्या त्रासाला कंटाळून निधीने त्याला संपविण्याचं ठरवलं. त्यासाठी तिने तिच्याकडे शिकवण्यासाठी येत असलेल्या तीन विद्यार्थ्यांची मदत घेतली.
पतीला संपवण्याच्या विचाराने तिने 13मे च्या रात्री तिच्या पतीला विष देऊन संपवलं. त्यानंतर त्याने मृतदेह रात्रभर घरातच ठेवला. ती दुसऱ्या दिवशी शाळेत गेली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय झाला. रात्री विद्यार्थ्यांच्या मदतीने शंतनूचा मृतदेह चौसाळा जंगलात नेण्यात आला आणि तिथे फेकण्यात आला. जेव्हा तिला भीती वाटू लागली की जर मृतदेहाची ओळख पटली तर तिच्या अडचणी वाढतील, तेव्हा ती पुन्हा जंगलात गेली आणि तिच्या पतीच्या शरीरावर पेट्रोल ओतून ते पेटवून दिले.