spot_img
महाराष्ट्रधक्कादायक! चिमुरडीला फरशीवर आपटून ठार मारलं; जन्मदात्या बापाच कृत्य...

धक्कादायक! चिमुरडीला फरशीवर आपटून ठार मारलं; जन्मदात्या बापाच कृत्य…

spot_img

Crime News: एका धक्कादायक घटनेत जन्मदात्या बापानेच कौटुंबिक वादातून आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला फरशीवर आपटून ठार मारले. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून परवेज फकरुद्दीन सिद्दिकी (वय ३६) याला अटक केली आहे. आफिया असे मृत मुलीचे नाव असून, ती आई-वडिलांसोबत येथील एलआयजी कॉलनी परिसरातील इमारत क्रमांक ३६ मध्ये राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवेज सिद्दिकी हा बेरोजगार होता.

शनिवारी दुपारी त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली, तेव्हा पत्नीच्या कुशीत असलेल्या आफियाला (Afiya) हिसकावून फरशीवर आपटले. यामध्ये आफिया गंभीर जखमी झाली. तिला तातडीने कुर्ला येथील भाभा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले.

आफियाची आई सबा परवेज सिद्दिकी (वय २६) हिच्या तक्रारीवरून विनोबा भावे नगर पोलिसांनीगुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. मात्र, आफियाच्या आईने सर्व हकीकत सांगितल्यावर शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून परवेजला अटक केली. या दाम्पत्याला तीन मुली असून आफियासर्वात लहान होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी!; ‘त्या’ यादीत आपले नाव आहे का? ते पाहा…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री;- नगर अर्बन बँकेत पाच लाखाहून अधिक रकमेच्या ठेवी अडकलेल्या ठेवीदारांना निम्मी...

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; ‘दो दिन के अंदर…’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांना बुधवारी रात्री...

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी ‘गुरुवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...