spot_img
अहमदनगरखळबळजनक! पेरूच्या बागेत आढळला युवकाचा मृतदेह, नेमकं काय घडलं?

खळबळजनक! पेरूच्या बागेत आढळला युवकाचा मृतदेह, नेमकं काय घडलं?

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री
साकुरी शिवारात मंगळवारी सकाळी राहाता येथील युवकाचा पेरूच्या बागेच्या शेडमध्ये मृतदेह आढळून आला असून राहाता पोलिसात सदर घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की साकुरी येथील मुकुंद दंडवते यांच्या पेरूच्या बागेमध्ये असलेल्या शेडमध्ये मयत विकी भालेराव मृतदेह आढळून आला.
विकी घरी न आल्याने मयताच्या भावाने आजूबाजूला तसेच त्याच्या सासुरवाडीला चौकशी केली असता त्या ठिकाणी आढळून आला नाही.

२८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वा च्या सुमारास मुकंद दंडवते यांनी मयत असलेल्या व्यक्तीच्या भावाला तुझा भाऊ विकी हा दारु पिवुन माझ्या पेरुच्या बागेच्या शेड मध्ये पडलेला आहे असे सांगितल्यानंतर मयत व्यक्तीच्या भावाने ताबडतोब साकुरी पेरूच्या बागेत जाऊन पहिले असता.

त्यांचा भाऊ विकी तेथे मयत अवस्थेत दिसला त्याचा मोबाईल बाजुला पडलेला होता. त्यांनी त्याला हात लावुन हलवण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. सदर घडलेले घटनेची माहिती राहाता पोलीस स्टेशन यांना देण्यात आली.

राहाता पोलिसांनी घडलेल्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून मयत विकी भालेराव यास ग्रामीण रुग्णालय राहाता आणले असता त्यास डॉक्टरांनी तपासानी करून मयत घोषीत केले आहे. याप्रकरणी राहाता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा करुन पुढील तपास पोहेको डी के अभंग करीत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

करंजी घाटातील ‘त्या’ टोळीचा पर्दाफाश; प्रवाशांसोबत करत होते असं काही..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री  करंजी घाटामध्ये वाहन अडवून लुटमार करणाऱ्या आरोपींची स्थानिक गुन्हे शाखेने धडक...

राष्ट्रवादी सोडून सुनीता भांगरे भाजपात; जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे समीकरण जुळले

अकोले । नगर सहयाद्री आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील सुनीता भांगरे यांनी...

‘मोंथा’ चक्रीवादळ महाराष्ट्राला देणार तडाखा! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

मुंबई | नगर सहयाद्री राज्यात ‘ऑक्टोबर हिट’मुळे तापमान वाढले असताना आता हवामानात अचानक बदल होण्याची...

आजचे राशी भविष्य! आज ‘या’ राशींना आश्चर्याचा सुखद धक्का बसणार, वाचा, तुमचे राशी भविष्य!

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्यपैश्याची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते...