Crime New: राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी अत्याचार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बुधवार दि. २६ रोजी स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये अभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरूणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमांतर्गत संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे. दत्तात्रय रामदास गाडे असे फरार आरोपीचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित तरुणी ही पुण्यात कामाला होती. घटनेच्या दिवशी ती सकाळी साडेपाच ते पावणेसहा दरम्यान ही तरुणी फलटणला आपल्या गावी निघाली होती. त्यासाठी ही तरुणी स्वारगेट डेपोत आली. त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे हा तरुणीच्या आजुबाजूला घुटमळत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. काही वेळाने आरोपी तिच्या बाजूला येऊन बसला आणि तिची विचारपूस करु लागला. आरोपीने तिला कुठे जायचे असे विचारले.
तेव्हा तिने फलटणला जातेय, असे सांगितले. तेव्हा त्याने सातारला जाणारी बस येथे लागत नाही असे सांगून तिला दुसरीकडे नेले. मुलगी बसजवळ पोहोचली तेव्हा अंधार होता. त्यामुळे तिला बसमध्ये चढायचे की नाही, हा प्रश्न पडला. त्यावर आरोपीने म्हटले की, रात्रीची बस आहे, लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहेत. तू वर चढून टॉर्चने चेक कर. त्यानंतर ही तरुणी बसच्या आतमध्ये गेली. तेव्हा आरोपीने पटकन आतमध्ये जाऊन बसचा दरवाजा लावून घेतला. यानंतर आरोपीने तरुणीवर अतिप्रसंग केला.
अरोपीच्या भावाला घेतलं ताब्यात
अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो देखील आता समोर आला आहे. आरोपीच्या मागावर पोलिसांचे ८ पथक रवाना झाले आहेत. आरोपीवर याआधी स्वारगेट पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे. आरोपीच्या भावाला पुणे पोलिसांन राहत्या गावातून शिरुरमधून त्याच्या भावाला ताब्यात घेतलं आहे.
नराधम आरोपी दत्तात्रय गाडे कोण?
या प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चेन स्नॅचींग सारखे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. मात्र, या घटनेनं पुन्हा एकदा पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्वारगेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रहदारी असते, अशातही आरोपीने या तरूणीवर एसटी बस स्थानकामध्ये असं कृत्य केल्यानं महिला सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे; चाकणकर
‘तरुण मुली, महिलांनी सार्वजनिक जीवनात वावरताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये’. ‘तुम्ही यंत्रणांची मदत घ्यावी. स्वतःची काळजी घ्यावी. माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपण सतर्क रहावे. अशा शब्दात रुपाली चाकणकरयांनी संताप व्यक्त केला आहे