spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! अचानक जोडप्याने आयुष्य संपवलं, विषारी औषध प्राशन करून आत्महत्या, कारण...

धक्कादायक! अचानक जोडप्याने आयुष्य संपवलं, विषारी औषध प्राशन करून आत्महत्या, कारण…

spot_img

Maharashtra Crime News: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संभाजीनगरमध्ये घडली. पैठण तालुक्यातील कातपूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप राहणाऱ्या जोडप्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. नवनाथ आणि शितल अशी आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कातपूर येथे नवनाथ शामराव जगधने (३० वर्षे) आणि शितल दोडवे-उघडे (२८ वर्ष) हे दोघे ५ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांनीही घराच्या टेरेसवर गोचीड मारण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. नवनाथ गुन्हेगार होता. तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. पॅरोलवर तो बाहेर आला होता. त्याचवेळी दोघांनीही टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

नवनाथ जगधनेला जालन्यातील अंबड येथे ६ वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि तो कारागृहात शिक्षा भोगत होता. सध्या तो एका महिन्याच्या पॅरेल सुट्टीवर आला होता. त्याला २८ मार्चला पुन्हा शिक्षा भोगण्यासाठी तुरूंगात जाण्यासाठी जायचे होते. पण त्यापूर्वीच नवथान आणि शीतलने आत्महत्या केली.

महत्वाचे म्हणजे, नवनाथने ज्या ६ वर्षांच्या मुलाची हत्या केली होती तो मुलगा शीतलचा होता. शीतलने ही कातपूरची राहणारी होती. तिचा विवाह काही दिवसांपूर्वी अंबडमधील एका तरुणासोबत झाला होता. २०२० मध्ये शीतलला भेटण्यासाठी नवनाथ तिच्या सासरी गेला होता. यावेळी प्रेमात अडथळा ठरणाऱ्या शीतलच्या मुलाची नवनाथने हत्या केली होती.

याप्रकरणी शीतल आणि नवनाथ या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली होती. याप्रकरणात शीतलची निर्दोष मुक्तता झाली होती तर नवनाथला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. शीतल ही गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगरमध्ये भाड्याने घर घेऊन राहत होती. अशातच पॅरोलमध्ये सुटून आलेला नवनाथ घरी आला. त्यावेळी शीतल आणि त्याने विष प्राशन करून आयुष्य संपवलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...