spot_img
देशधक्कादायक! पहिलीच्या विद्यार्थ्याने तिसरीच्या मुलाला घातली गोळी, कुठे घडली घटना पहा...

धक्कादायक! पहिलीच्या विद्यार्थ्याने तिसरीच्या मुलाला घातली गोळी, कुठे घडली घटना पहा…

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम
बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंजमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. लालपट्टी भागातील एका खासगी शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्याने थेट तिसरीत शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थ्यावर गोळ्या झाडल्या आहेत. विद्यार्थ्याच्या हातात गोळी लागली आहे. धक्कादायक म्हणजे पिस्तुल बॅगेत घेऊन मुलगा शाळेत आला होता. जखमी मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे, मात्र एका ६-७ वर्षाच्या मुलाला इतंक धाडस कुठून आलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. विद्यार्थ्याकडे हे हत्यार कसे आले याचा शोध पोलीस घेत आहेत. विद्यार्थ्याचे वडील पूर्वी या शाळेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. मुलाला गोळी लागली असून जखमी झाल्याची माहिती मुख्याध्यापिकेने त्यांच्या कुटुंबीयांना दिली.

जखमी मुलाच्या मामाने सांगितले की, त्याचा भाचा सेंट जॉन बोर्डिंग स्कूलमध्ये तिसरीच्या वर्गात शिकतो. आज सकाळी तो शाळेत गेल्यानंतर प्रथम तो प्रार्थनेला गेला आणि नंतर त्याच्या वर्गात गेला. यावेळी मुकेश कुमार यादव यांच्या मुलाने त्यांच्या भाच्यावर गोळ्या झाडल्या. आरोपी मुलाशी पुतण्याचे कोणत्याही प्रकारचे भांडण झालेलं नाही.मुलाने आधी त्याच्या कमरेला गोळी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हाताला गोळी लागली. गोळीबारानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी पिस्तुल ताब्यात घेतले आणि मुलाच्या पालकांना बोलावून घेतलं.

गोळी झाडणाऱ्या मुलाचे वडील शाळेत पोहोचले आणि त्यांनी मुख्याध्यापकांच्या खोलीत टेबलावर बंदूक ठेवलेली पाहिली. टेबलावर बंदूक आणि मॅगझिन स्वतंत्रपणे ठेवले होते. त्याने पिस्तुलावर झडप घातली आणि मुलासह भिंतीवरून उडी मारून तेथून पळ काढला. ज्या बाईकवरून तो शाळेत पोहोचला ती शाळेत आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडे करण्याची मागणी जखमी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेनंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. एक लहान मूल असे कृत्य करेल यावर त्यांचा विश्वास बसत नाही. आरोपी मुलाच्या पालकांचीही चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....