spot_img
अहमदनगरधक्कादायक: व्यापार्‍यांच्या जमीनीवर ताबेमारी, कुठे घडली घटना...

धक्कादायक: व्यापार्‍यांच्या जमीनीवर ताबेमारी, कुठे घडली घटना…

spot_img

व्यापार्‍यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेतली एसपींची भेट
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

नगर तालुक्यात शहरातील व्यापार्‍यांच्या जमीनीवर ताबेमारी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे व्यापारी बांधवांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली.

नगर शहरातील व्यापार्‍यांच्या जमिनीवर नगर तालुयातील वाटेफळ येथील अनिल वालचंद गांधी, विजय वालचंद गांधी बाबुर्डी येथे सुदर्शन डुंगुरवाल आणि वाकोडी येथे धनेश कोठारी यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करीत राजरोजपणे पाल टाकण्यात आले आहे. त्याच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी संघटित होऊन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, जयेश पोखरणा, पिंटू कटारिया, कमलेश भंडारी, दिनेश संकलेचा, रोहन बोरा, संदीप बोरा, गणेश बुरा, नितीन शिंगवी, रितेश सोनीमडलेचा, सचिन छाजेड, मनीष लोढा, ईश्वर बोरा, दिनेश संकलेचा, भरत गुरुनानी, पराग मानधना आदीसह व्यापरी मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन व्यापारी वर्गाला दिले.

व्यापार्‍यांना त्रास देणार्‍यांचा
बंदोबस्त करा ः आ. जगताप
शहरातील व्यापार्‍यांच्या जमिनीवर नगर तालुयातील गावांमध्ये विशिष्ट समाजाकडून पाल टाकून ताबेमारी केली जाते. तसेच खंडणी मागत दमबाजी केली जाते अशा लोकांचा बंदोबस्त करावा यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून यावेळी कारवाईची मागणी केली. तसेच अशा प्रवृत्तीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारकडे कायदा करण्याची मागणी केली जाईल. सर्वसामान्य लोकांना न्याय-हक्क मिळाला पाहिजे यासाठी काम करणार असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आज मंत्री कोकाटेंचा सेंडऑफ? रोहित पवारांची बोचरी टीका

Rohit Pawar: सभागृहात कार्ड गेम खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या जोर...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कुठे घडली घटना?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील एका गावात दोन महिन्यांपूर्वी एका 11...

जुनी इच्छा पूर्ण होणार? कसा जाणार सर्वांचा दिवस?, वाचा आजचे भविष्य!

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. जर तुमची...

ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना महत्वाचे आदेश

वर्धा / नगर सह्याद्री - राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. सुरुवातीला जिल्हा...