Maharashtra News Today: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीत घडलेल्या प्रकारामुळे नातेवाईकांची धावपळ उडाली आणि ते मृतदेह सोडून पळ काढावा लागला. सदरची घटना जळगावच्या पारोळातालुक्यातील नगावात घडली आहे.
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नातेवाईकांची एकच धावपळ उडाली.
मधमाशांनी हल्ला केल्यानंतर, स्वतःचा बचाव करण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी झालेले शोकाकुल नातेवाईक मृतदेह सोडून पळाले. रस्त्यात अचानक मधमाशांचे पोळे उठले आणि त्यांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले, तर काही जण किरकोळ जखमी झाले.