Crime News: मॉलमधील स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने केला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी ‘गुड हॅपी स्पा अँड सलून’ मध्ये अचानक छापा टाकत दोन पुरुष आणि पाच महिलांना रंगेहाथ अटक केली. दरम्यान, स्पा सेंटरचे मालक पती-पत्नी अनुभव आणि शालू हे छाप्यानंतर पसार झाले असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटला स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर लैंगिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर प्रभारी विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने अचानक कारवाई केली. छाप्यावेळी दोन केबिन्समध्ये पुरुष व महिला आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह साहित्य जप्त केलं असून, आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं.
स्पा सेंटर चालवणारे अनुभव व शालू हे आरके पुरम कॉलनी (सिडकुल)चे रहिवासी असून, कारवाईच्या वेळी ते दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणात संबंधित आरोपींवर वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायदा, तसेच अन्य संबंधित कलमांनुसार हरिद्वारच्या सिडकुल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या अटक आरोपींची चौकशी सुरु असून, या रॅकेटचा आणखी कुणाशी संबंध आहे का, याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे.