spot_img
अहमदनगरशहरात धक्कादायक घटना! खासगी बँकेच्या गेटवर ठेवीदाराची आत्महत्या; पैसे मिळत नसल्यामुळे आत्महत्येचं...

शहरात धक्कादायक घटना! खासगी बँकेच्या गेटवर ठेवीदाराची आत्महत्या; पैसे मिळत नसल्यामुळे आत्महत्येचं पाऊल..

spot_img

Maharashtra Crime News: शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या लग्नाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बापाने खासगी बँकेसमोरच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गेवराईमधील छत्रपती मल्टीस्टेट या खासगी बँकेसमोर ठेवीदाराने गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश आत्माराम जाधव असे आयुष्याचा दोर कापणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

या धक्कादायक घटनेनंतर गेवराईमध्ये एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील सुरेश आत्माराम जाधव नामक चाळीस वर्षे व्यक्तीने केली आत्महत्या.11 लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवल्याची माहिती मिळाली आहे. वारंवार पैसे मागूनही बँकेकडून पैसे दिले जात नसल्याने जाधव यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याची माहिती मिळाली.

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. जाधव यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलािसांनी मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवला असून पुढील तपास करण्यात येत आहे. रक्कम किती होती आणि याबाबतची इतर संपूर्ण माहिती घेऊन रीतसर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती गेवराई पोलिसांनी दिली आहे. या प्रकारानंतर गेवराईमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...

तर शिक्षकांनी राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

नागपूर / नगर सह्याद्री - खडतर अर्थात जास्त काठीण्य पातळी असणारी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण...