spot_img
अहमदनगरसावेडीत धक्कादायक प्रकार! घाबरलेल्या महिलेचा ११२ वर कॉल..; नेमकं काय घडलं?

सावेडीत धक्कादायक प्रकार! घाबरलेल्या महिलेचा ११२ वर कॉल..; नेमकं काय घडलं?

spot_img

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:-
सावेडी परिसरातील पाईपलाईन रोड येथे 2 मे रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारणार्‍या 29 वर्षीय महिलेस एकटक पाहून अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती बहिणीसोबत रात्री जेवणानंतर कॉलनीमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेली होती. त्यावेळी विनायक नन्नवरे (वय 32, रा. यशोदानगर कॉलनी, पाईपलाईन रस्ता) याने तिच्याकडे एकटक पाहून अश्लील हावभाव करत तिचा मानसिक छळ केला.

त्याच्या हातातील प्लास्टिकच्या पिशवीतून काहीतरी वस्तू काढून तो अश्लील हावभाव करत होता. त्यानंतर त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करत पीडितेला ठार मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने तात्काळ डायल 112 वर संपर्क साधत पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी संपूर्ण माहिती घेत संशयित आरोपी विनायक नन्नवरे याला ताब्यात घेतले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पहा कुठे कोसळला?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री दुष्काळाचे सावट असणार्‍या नगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली....

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही मुलींनी मारली बाजी; किती टक्के लागला निकाल, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नघतर सहयाद्री:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा...

नहाटाने इंजिनिअरला फसवले; एक कोटीचे प्रकरण काय?, वाचा सविस्तर

पुणे । नगर सहयाद्री:- सरकारी मॅग्नेट प्रोजेक्टच्या नावाखाली सॉफ्टवेअर इंजिनिअरची 2 कोटी 60 लाख...

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठक जिल्हा विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल; मंत्री विखे

अहील्यानगर । नगर सहयाद्री:- चौंडी येथे मंत्रीमंडळाची प्रथमच होत असलेली बैठक जिल्ह्याच्या दृष्टीने एैतिहासिक...