अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात राहुल नारायण मेरगु (रा. कुंभार गल्ली, तोफखाना, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता ते आजपर्यंत कल्याण रोडवरील जाधव पेट्रोल पंपामागे आरोपीने महिलेला चहात गुंगीकारक औषध देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यावेळी तिचे नग्न फोटो काढून ते फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी शारीरिक छळ केला.
यासोबतच आरोपीने महिलेकडून 14,74,800 रुपये उकळले.महिलेने 11 जुलै 2025 रोजी रात्री 8:30 वाजता कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती आणि तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.