spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

spot_img

अकोले | नगर सह्याद्री
अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड अकोले,वय 76) व त्यांच्या मुलीस सोफा व खुचला दोरीने बांधून, चॉपर व पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी देत चार इसमांनी 2 लाख 29 हजार रुपयांच्या मुद्देमालासह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत अकोले पोलिसांत काशीबाई डोंगरे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, दि 18 एप्रि 2025 रोजी पहाटे सव्वा पाच वाजेपासून ते सकाळी 11-30 वाजेच्या दरम्यान डोंगरे निवास, देवठाण रोड, मॉडर्न हायस्कूल जवळ अकोले येथील बंगल्यात फिर्यादी असताना आरोपी ओमकार शेटे (पूर्ण नाव माहीत नाही), निखिल चौधरी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), प्रभाकर भिमाजी वाकचौरे (राहणार नवलेवाडी, तालुका अकोले) व बाहेरी एक अज्ञात इसम यांनी फिर्यादी यांच्या घरी येऊन काशीबाई व त्यांची मुलगी राणी हिस सुती दोरीने सोफा व खुचला बांधून ठेऊन तिच्या तोंडाला चिकट टेप लावला.

आधीमधी चिकट टेप काढून या दोघींकडून घरातील वस्तुंची माहिती घेऊन माहिती न दिल्यास मारहाण करून चॉपर व पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी देत घरातील कागदपत्रे, बँकेचे सह्या असलेले कोरे चेक, बँकेच्या लॉकरची चावी, सोन्याचे दागिने, मोबाईल व ॲॅक्टिवा स्कुटी आणि रोख रक्कम असा एकूण अंदाजे 2,29,000 रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम बळजबरीने आरोपींनी चोरून नेला. या फिर्यादीवरून अकोले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी खांडबहाले करत आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...