अहिल्यानगर | नगर सहयाद्री:-
अहिल्यानगरात वेठबिगारीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांनी १२ ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात जाकिश बबड्या काळे आणि किशोर पोपट चव्हाण यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
फिर्यादीनुसार, जाकिश काळे (वय ३५, रा. भोसले आखाडा, बुरुडगांव रोड) आणि किशोर चव्हाण (रा. अरणगांव, फरार) यांनी तीन जाकिश आणि किशोर यांनी फारुक मेहबुब शेख (वय ५५, नागपूर), कृष्णाराम रंगनाथ (बिलासपूर, उत्तरप्रदेश) आणि बाबूजी सुरजबल्ली (वय २५) यांना गुलामासारखे डांबून ठेवले होते.
एक ते दोन वर्षांपासून बळजबरीने गोठ्यात जनावरांचे शेण काढण्यास आणि इतर कामे करण्यास भाग पाडले. त्यांना जेवण न देता, मारहाण करून आणि शिवीगाळ करून गुलामासारखी वागणूक दिली. पोलिसांनी १२ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता छापा टाकून जाकिशला ताब्यात घेतले, तर किशोर फरार झाला.