spot_img
महाराष्ट्रधक्कादायक प्रकार! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला रक्तबंबाळ केलं; कारण काय?

धक्कादायक प्रकार! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला रक्तबंबाळ केलं; कारण काय?

spot_img

Crime News: एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. संतापाच्या भरात प्रियकरानं प्रेयसीच्या गळ्यावर चाकू ठेवून वार केले आहेत. प्रियकराचं लग्न झालं होतं. त्यानंतर देखील प्रेयसीसोबत प्रेमसंबंध कायम ठेवले होते. याकारणामुळे त्यानं बायकोला सोडचिठ्ठी दिली. मात्र, प्रेयसीनं लग्नास नकार दिल्यामुळे तिच्या गळ्यावर चाकू ठेवून प्राणघातक हल्ला केला. सध्या तिची प्रकृती गंभीर असून, रूग्णालयात उपचार सुरू आहे.

रोशन सोनेकर असं हल्ला करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील गुमथी गावातून उघडकीस आली आहे. रोशनचं २० वर्षीय तरूणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोघांचं रिलेशनशिप सुरू होतं. मात्र, त्यानंतर रोशनचं लग्न झालं.

रोशनचं लग्न झाल्यानंतरही त्यानं प्रेयसीसोबत प्रेमसंबंध कायम ठेवले. यानंतर त्याचे बायकोसोबत खटके उडाले. त्यानं बायकोला सोडचिठ्ठी दिली. काडीमोड घेतल्यानंतर त्यानं प्रेयसीसोबत संपर्क कायम ठेवला. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी तो दारूच्या व्यसनाधीन गेला. प्रेयसीला त्रास देणे, मारहाण करणे असा प्रकार सुरू होता.

याच त्रासाला कंटाळून प्रेयसीनं प्रियकरासोबत लग्न करण्यास नकार दिला. प्रेयसीनं दिलेल्या नकारामुळे त्याला राग अनावर झाला. रोशनचं प्रेयसीसोबत कडाक्याचं भांडण झालं. यानंतर प्रेयसी हनुमान मंदिरात पुजा करीत होती. पुजा करीत असतानाच त्यानं प्रेयसीच्या गळ्यावर चाकू ठेवून वार केले.

चाकूनं वार केल्यामुळे रक्तबंबाळ झालेली तरूणी जमिनीवर कोसळली. गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीला तातडीनं रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, खापरखेडा पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; आंदोलनात दगडफेक,वाहनांची तोडफोड

नंदूरबार / नगर सह्याद्री - नंदूरबारमधील आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलनात दगडफेक झाल्यानंतर...

शिर्डी साई संस्थान समितीच्या नियुक्तीला स्थगिती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिर्डी साई संस्थान समितीप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला असून...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारनेर दौऱ्याला विरोध; भूमिपुत्र संघटना व पारनेर कारखाना बचाव समिती आक्रमक

पारनेर | नगर सह्याद्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्याचे...

पारनेर तालुक्यात ‘आर्थिक’ सुनामीची लाट; ‘या’ पतसंस्थेत 81 कोटींचा अपहार

पारनेर | नगर सह्याद्री कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील राजे शिवाजी सहकारी पतसंस्थेत तब्बल 81...