spot_img
अहमदनगरधक्कादायक घटना: प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून खून, मृतदेह रिक्षात ठेवून फरार

धक्कादायक घटना: प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून खून, मृतदेह रिक्षात ठेवून फरार

spot_img

पिंपरी चिंचवड / नगर सह्याद्री –
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. प्रेयसीचा मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर असलेल्या रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाला आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शिवानी सोमनाथ सुपेकर असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता हा प्रकार उघडकीस आला. प्रियकर विनायक आवळे याच्यावर पोलिसांना संशय आहे. परंतु, तो फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

माहितीनुसार, संशयित प्रियकर विनायक आवळे आणि शिवानी सुपेकर हे मागील दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मंगळवारी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातच विनायकने रागाच्या भरात शिवानीचा गळा आवळून तिचा खून केला.

शिवानीचा मृत्यू झाल्यानंतर, विनायकने तिचा मृतदेह एका रिक्षामध्ये ठेवला आणि ती रिक्षा शिवानीच्या आईच्या घरासमोर पार्क केली. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. खून, दरोडा आणि बलात्कार यासारख्या गुन्ह्यांमुळे परिसरात अस्वस्थता वाढली आहे. पोलिसांना या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आव्हानाचा सामना करावा लागत आहे. वाकड पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

याचप्रमाणे, नागपूरमध्ये एका धक्कादायक घटनेत ५७ वर्षीय हॉटेल मालकाने २५ वर्षीय तरुणीची हत्या केली आहे. लग्नाचा तगादा लावत ब्लॅकमेल केल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाने त्या तरुणीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...