spot_img
अहमदनगरनगर शहरातील 'या' पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार; तरुणासोबत घडलं असं काही...

नगर शहरातील ‘या’ पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार; तरुणासोबत घडलं असं काही…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
एमआयडीसीतील गरवारे चौक येथील भारत पेट्रोल पंपावर सोमवारी (२४ मार्च) एका तरुणावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. शहारूख नवशाद शेख (वय २८ रा. रेणुकानगर, एमआयडीसी) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, त्यांनी गुरूवारी (२७ मार्च) दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ओळखीचा राहुल (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शाहरूख नवशाद शेख हे आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी सोमवारी ७:३० वाजता एमआयडीसीतील गरवारे चौकातील भारत पेट्रोल पंपावर गेले होते.

त्यांनी संशयित आरोपीला पेट्रोलचे पैसे देण्यास सांगितले असता, संशयित आरोपीने शिवीगाळ करत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या हातावर, छातीवर आणि मानेजवळ जखमा झाल्या. दरम्यान, जखमी फिर्यादी यांनी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना गुरूवारी माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार जाधव करत आहेत.

दरम्यान, एमआयडीसी हद्दीत किरकोळ वादातून वारंवार धारदार शस्त्राने हल्ला करण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. येथील व्यापारी, कामगार यांच्यावर वारंवार हल्ला होत असल्याच्या घटना घडत असल्याने एमआयडीसीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या घटना रोखण्यात कोणतेही पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नारा महायुतीचा, तयारी स्वबळाची!; विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट, कोतकरांची महापालिकेला एण्ट्री

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका,  महाविकास आघाडीत शांतताच शांतता सुनिल चोभे | नगर सह्याद्री:- आगामी होऊ...

माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन; चित्रा वाघ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे....

ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बुधवारी ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त...

बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाचा जोर वाढला; 12 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई | नगर सह्याद्री गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार...