spot_img
ब्रेकिंगरंगोली चौकात धक्कादायक घटना! होंडाई गाडीतील चार व्यक्तींनी केलं असं काही..

रंगोली चौकात धक्कादायक घटना! होंडाई गाडीतील चार व्यक्तींनी केलं असं काही..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
व्यवसायातून वैयक्तिक रोष मनात धरून काही अज्ञात व्यक्तींनी एका व्यापाऱ्याच्या गाडीचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना केडगाव येथील रंगोली चौकात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल ओमप्रकाश (वय 40, रा. शिल्पनगर, संभाजीनगर) असे फिर्यादीचे नाव आहे. ते स्वतःची एमएच 20 ईएफ 2550 जिप गाडी चालवत रांजणगाव एमआयडीसी येथील मिटिंग संपवून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. रंगोली चौकात एमएच 16 सीव्ही 8334 क्रमांकाच्या होंडाई व्हेन्यू गाडीतील अज्ञात चालक आणि त्याच्यासोबतच्या 3-4 अनोळखी व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला. लाकडी दांडक्यांसह हातात लोखंडी रॉड घेऊन त्यांनी फिर्यादीला धमकावत जीव मारण्याची धमकी दिली.

या गोंधळात आरोपींनी फिर्यादीची गाडी अडवून तिच्या डाव्या बाजूला धडक दिली. गाडीचे नुकसान झाले असून, एकूण हल्ला पूर्वनियोजित स्वरूपाचा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. तपास कोतवाली पोलिस स्टेशनचे पोनि प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणात आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सीसीटीव्हीत चोरटा कैद?; मार्केटयार्ड परिसरात घडली ‘तसली’ घटना..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यागर शहरातील मार्केटयार्ड परिसरातील जंगदंबा कृषी सेवा केंद्रातून अज्ञात व्यक्तीने 37...

मावा तयार करणाऱ्या टोळीवर धाड!, माव्याचे नमुने तपासणीसाठी रवाना..

पाच आरोपी अटकेत; चार लाखांचा मुद्देमाल जप्त शेवगाव | नगर सह्याद्री पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने...

गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही तर महाराष्ट्रात का?; राज ठाकरे कडाडले, मुख्यमंत्री म्हणाले…

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणार नाही. शेजारच्या गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही, मग...

राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना वेग; प्रभाग रचनेसाठी समित्या गठीत

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- ग्रामविकास विभागाच्या आदेशानूसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या...