spot_img
अहमदनगरपोस्ट ऑफिसमध्ये धक्कादायक प्रकार!, कर्मचार्‍यासोबत घडलं असं काही..

पोस्ट ऑफिसमध्ये धक्कादायक प्रकार!, कर्मचार्‍यासोबत घडलं असं काही..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचारी संदीप निवृत्ती मिसाळ (वय ३५, रा. तपोवन रोड, साईनगर) यांना अज्ञात व्यक्तीने मारहाण करून धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, २७ जून २०२५ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास खिडकी क्रमांक २ येथे ही घटना घडली.

संदीप मिसाळ हे पोस्ट ऑफिसमध्ये लार्क म्हणून कार्यरत असताना, बदामी रंगाचा पट्टेदार शर्ट आणि काळी पँट घातलेला अंदाजे ४० वरर्षांचा अज्ञात व्यक्ती तिथे आला. त्याने तुम्ही माझे पैसे खाल्ले असा आरोप करत मिसाळ यांची कॉलर पकडली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि तुला बघून घेतो अशी धमकी दिली.

यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला आणि परिसरात दहशत पसरली. या घटनेनंतर मिसाळ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पुढील तपास पोहेका मिना शेख करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात गारठा वाढला, ‘या’ जिल्ह्यात कडाक्याची थंडी, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई । नगर सहयाद्री:- उत्तरेकडील थंड वारे राज्याच्या दिशेने वाहू लागल्याने गारठा वाढला आहे....

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींच्या नशिबात दडलंय काय? वाचा सविस्तर

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

पारनेरचे माफिया राज रोखण्यासाठी निवडणूकीत महायुतीला पाठबळ द्या : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निघोज / प्रतिनिधी रेडबुलचा वापर करुण पारनेरचा माफियाराज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागीरीला सामोरे जावे लागत...

अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर / नगर सह्याद्री : राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले...