अहिल्यानगर | नगर सहयाद्री:-
माळीवाडा बसस्थानक ते वाळूंज (ता. अहिल्यानगर) एसटीबस प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगमध्ये ठेवलेले 40 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र कोणीतरी चोरून नेले. ही घटना रविवारी (11 मे) सकाळी घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मंडाबाई सर्जेराव नवले (रा. गुरवपिंप्री, ता. कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले की, रविवारी सकाळी माळीवाडा, अहिल्यानगर ते वाळूंज एसटी बसने प्रवास करीत असताना सोन्याचे मंगळसूत्र बरोबर असणार्या संगीता गावडे यांच्या बॅगमध्ये ठेवण्यासाठी दिले. ते मंगळसूत्र कोणीतरी चोरट्याने चोरून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार संदीप पितळे करीत आहेत.