spot_img
अहमदनगरधक्कादायक : नगरमध्ये जीबीएसचे चार रुग्ण आढळले

धक्कादायक : नगरमध्ये जीबीएसचे चार रुग्ण आढळले

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
गुलीयन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) नावाच्या आजाराने पुण्यात थैमान घातले असतानाच अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात जीबीएस संशयित चार रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. हे चौघेही रुग्ण शहराबाहेरील असून एकाला पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर, तिघांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयात एक अल्पवयीन मुलगी जीबीएस संशयीत आढळल्याने तिला तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. सदर मुलगी ही जिल्ह्याबाहेरील असल्याचे सांगण्यात आले. तर, शहरातील खासगी रुग्णालयात तीन संशयित रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेकडे प्राप्त झाली आहे. त्या तिघांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत आहे. खासगी रुग्णालयात आढळलेले रुग्ण आष्टी (बीड), वाकोडी व राहुरी तालुक्यातील आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, गुलीयन बॅरी सिंड्रोम हा संसर्गजन्य आजार नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शहरात खासगी रुग्णालयात आढळलेले रुग्ण शहरातील नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास महापालिकेला कळवण्याच्या सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत, असे महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी सांगितले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोटभर रुपयांची फसवणूक करणार्‍या चौघांना बेड्या! आयटी इंजिनिअर सोबत नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आयटी इंजिनिअरची...

२१०० रुपये कधी मिळणार?; लाडक्या बहि‍णींसाठी महत्वाची अपडेट!

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींचा भाग्योदय! कार्यक्षेत्रात प्रगती, अचानक धनलाभ!

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून...

“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा

पुणे / नगर सह्याद्री - ‘भगवानगडाचे महंत ह. भ. प. नामदेव महाराज शास्त्री यांनी...