spot_img
ब्रेकिंगधक्कादायक: महिला कीर्तनकाराची हत्या; आश्रमातच दगडाने ठेचून मारलं!

धक्कादायक: महिला कीर्तनकाराची हत्या; आश्रमातच दगडाने ठेचून मारलं!

spot_img

Maharashtra Crime News: वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात एका आश्रमात घडलेली खळबळजनक घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ठरली आहे. प्रसिद्ध महिला कीर्तनकार संगीताताई महाराज पवार यांची अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी रात्री त्यांच्या आश्रमात घुसून दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात मारेकऱ्यांनी संगीताताई महाराज यांच्यावर आश्रमातच हल्ला करून दगडाने ठेचून त्यांचा जीव घेतला. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पोलिसांकडून आश्रमातील कर्मचारी व संबंधितांची कसून चौकशी सुरू आहे. श्वानपथकासह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा करत आहे.

अद्याप मारेकऱ्याची ओळख पटलेली नसून हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा तपास पोलीस करत आहेत. संगीताताई महाराज या कीर्तनातून अध्यात्मिक जागृती करणाऱ्या प्रभावशाली वक्त्या होत्या. त्यांच्या निधनामुळे वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी वारकरी संप्रदायातून होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा...

दिल्लीगेट परिसरात राडा; दुचाकी फोडल्या, तरुणांना घेरलं, नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पूर्वीच्या किरकोळ वादाचा राग मनात धरून दिल्लीगेट परिसरात राडा घातल्याची...