spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! महापालिका अधिकाऱ्यांची हप्तेखोरी उघड!

धक्कादायक! महापालिका अधिकाऱ्यांची हप्तेखोरी उघड!

spot_img

महापालिका क्षेत्रात खळबळ | दोन कर्मचाऱ्यांचे ऑडिओ संभाषण व्हायरल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त पंकज जावळे आणि स्वीय सहायक शेखर देशपांडे यांचे लाचखोरी प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा महापालिकेतील अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांमधील हप्तेखोरीचा ऑडिओ व्हायरल झाल्याने अहिल्यानगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यात आयुक्त, दोन्ही उपायुक्त व विभागप्रमुखांची नावे असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अहिल्यानगर शहरात रस्ता बाजू शुल्क वसुली करणारे महापालिकेचे कर्मचारी विभाग प्रमुखांना दररोज 200 ते 500 रुपये हप्ता देत असल्याचे संभाषण असणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. रस्त्यालगत,मनपाच्या मोकळ्या जागेत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांकडून दररोज रस्ता बाजू शुल्क वसुली केली जाते. ठेकेदार संस्थेची नियुक्ती न झाल्याने मार्केट विभागातील सुमारे 15 कर्मचाऱ्यांमार्फत रस्ता बाजू शुल्क वसुली केली जात आहे.

या वसुली कर्मचाऱ्यांकडून विभागप्रमुखांना हप्ता दिला जात असल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप गुरुवारी व्हायरल झाली. यात विभागप्रमुखांना दररोज 200 ते 500 रुपये हप्ता दिला जात असल्याचे एक कर्मचारी दुसऱ्या कर्मचाऱ्याला सांगत आहे. दरम्यान व्हायरल ऑडिओ क्लीपची आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी याची गंभीर दखल घेतली असून, उपायुक्त प्रियांका शिंदे यांना चौकशी करून 24 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

विभागप्रमुखांना 500 रुपये हप्ता
महापालिका कर्मचाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओमुळे महापालिकेतील हप्तेखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. ऑडिओमध्ये आपण विभागप्रमुखांना 200, 300, 500 रुपये हप्ता देतो असा वारंवार उल्लेख आहे. त्यामुळे कोण कोणता कर्मचारी कोणत्या विभागप्रमुखांना हप्ता देतो, तसेच कोणते विभागप्रमुख हप्ता घेतात, आयुक्त चौकशी करुन कोणावर आणि किती जणांवर कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आयुक्त, उपायुक्तांच्या नावे हप्तेखारी!
अहिल्यानगर महापालिका कोणत्या ना कोण्यात कारणाने नेहमी चर्चेत असते, यापूवही आयुक्त, महापौर यांचे स्वीय सहायक लाचप्रकरणी रंगेहाथ पकडले गेले आहेत. दरम्यान, नुकत्याच व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये आयुक्त, उपायुक्त व विभाग प्रमुखांच्या नावाचा उल्लेख आहे. तसेच विभागप्रमुख पुंडला 200, 300 ते 500 रुपये हप्ता देत असल्याचा वारंवार उल्लेख ऑडिओमध्ये आहे.

साहेब सत्याची बाजू धरा… कर्मचाऱ्याची लिपिकास आर्त हाक
दोन कर्मचाऱ्यांमधील महापालिका अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीचा ऑडिओ व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. तसेच शिपाई कर्मचारी मला शारीरिक, मानसिक संतारप दिलाय. मी माझ्या जीवाचे बरे वाईट, काहीही करु शकतो. त्याला विभागप्रमुख जबाबदार असतील. लिपिक साहेब तुम्ही सत्त्याची बाजू धरा अशी आर्त हाक शिपाई कर्मचाऱ्याने लिपिकास दिली. तसेच गेल्या 18 महिन्यांचा हिशोब मी पुंड साहेबांना विचारणार असल्याचे ऑडिओ क्लीपमध्ये म्हटले आहे.

दोन कर्मचाऱ्यांमधील संभाषण
शेंदूरकर : साहेबाला आपण काम करतो, हप्ता 200, 500 देतो.
पालवे : आपणच सगळ्यात जास्त दिला या वेळेस.
शेंदूरकर : या वेळेस मंगळवारी आपण गेलो होतो. तू 300 रुपये दिला, मी 600 रुपये दिला. दिला की नाही दिला?
पालवे : दिला ना.
शेंदूरकर : मग आता ते म्हणतात, याला फोन करा, त्याला फोन करा, तो आलाच नाही.
पालवे : तुम्हाला केला होता का आज? फोन
शेंदूरकर : दुपारी फोन केला होता मला त्यांनी. मी उचलला नाही.
पालवे : 100 रुपये भरणा दाखवला बरं का आज.
शेंदूरकर : कोणी दाखवला, कोणी भरले, साहेबांनी भरले का? कोणी टाकले पैसे?
पालवे : साहेबांनी, सांगितले होते, पैसे कोणी टाकले माहिती नाही.
शेंदूरकर : अरे बसस्टँडच्या जवळ अतिक्रमण मोहीम चालू आहे. ज्या दोन-चार गाड्या आहेत ते पण पैसे देत नाहीत. तरी पण 100 रुपये दाखवला त्यांनी. मग साहेबांनी टाकला का.
पालवे : काय माहिती कोणी टाकला.
शेंदूरकर : असं नाही ना राव आपण सगळं करतो त्यांना 300, 500 हप्ता, सगळे चालू आहे ना. त्यांच्या जवळचे माणसं घ्यायचे आणि चांगल्या बाजारला द्यायचे आणि आपण थांबायचं असंच.
पालवे : जाऊ दे आता बघा तुमच्या हिशोबानी…

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मांडओहळ धरणातून उद्या आवर्तन सुटणार ; आ. काशिनाथ दातेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

पारनेर / नगर सह्याद्री - सोमवार दि. २३ डिसेंबर २०२४ परतीचा मान्सून समाधानकारक न झाल्यामुळे...

परभणीत राहुल गांधींचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले पहा

परभणी / नगर सह्याद्री - सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवरून राज्यातील राजकारण तापलंय. सूर्यवंशी यांच्या...

पुणतांब्यात धार्मिक स्थळी तोडफोड; ग्रामस्थ आक्रमक

राहता । नगर सहयाद्री:- राहता तालुक्यातील पुणतांबा गावात अज्ञात समाजकंटकांनी एका धार्मिकस्थळी तोडफोड केल्याची घटना...

Weather Update: हवामान बिघडलं! हिवाळ्यात पावसाळा; हवामान विभागाकडून अलर्ट

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच राज्यात पाऊस बरसणार असल्याची...