spot_img
अहमदनगरबेपत्ता प्रेमीयुगुलाचा धक्कादायक शेवट! अहिल्यानगर जिल्ह्यात सापडले मृतदेह

बेपत्ता प्रेमीयुगुलाचा धक्कादायक शेवट! अहिल्यानगर जिल्ह्यात सापडले मृतदेह

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घुमटवाडी शिवारात प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यातील मृत मुलाचे नाव प्रसाद सुरेश मरकड (वय २४, रा. दुलेचांदगाव) आणि भाग्यश्री शंकर वखरे (वय २३, रा. माळेगाव, ता. पाथर्डी) असे मुलीचे नाव आहे. वनविभागाच्या हद्दीतील जमिनीवर मृतदेह आढळले आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पाथर्डी तालुक्यातील प्रसाद सुरेश मरकड (वय २४, रा. दुलेचांदगाव) आणि भाग्यश्री शंकर वखरे (वय २३, रा. माळेगाव, ता. पाथर्डी) या प्रेमी जोडप्याचे वनविभागाच्या हद्दीतील जमिनीवर मृतदेह आढळले. प्रसादचा मृतदेह झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत, तर भाग्यश्रीचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. दोन्ही मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत असल्याने या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

दोन्ही मृतदेह अर्धवट जळालेले असून, भाग्यश्रीच्या मृतदेहाचा काही भाग वन्य प्राण्यांनी खाल्ल्याचे आढळून आले आहे. वनविभागाच्या या परिसरात आग लागल्याने मृतदेह जळाले असावेत, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळाजवळ विषारी औषध आणि थंडपेयाच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये करत असून, पोलिस हेडकॉन्स्टेबल सुहास गायकवाड त्यांना मदत करत आहेत.

दहा दिवसांपासून बेपत्ता
प्रसाद आणि भाग्यश्री हे दोघेही गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या नातेवाइकांनी याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. प्रसाद हा अविवाहित होता, तर भाग्यश्रीचा विवाह झाला असून तिला एक मुलगा आहे. दोघांनी घर सोडल्यानंतर त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता, आणि आता त्यांचे मृतदेह अशा अवस्थेत सापडल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटांत राडा; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- रस्ताच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना अहिल्यानगर तालुक्यातील शिंगवे नाईक ते गोपी...

‘महिलेला डंपर खाली…’; नगरमध्ये वाळू तस्करांचा धुमाकूळ!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात वाळू व गौण खनिज तस्करांचे कारनामे नेहमीच समोर येत...

बळीराजाला खुशखबर! राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ वस्तू मिळणार विनामूल्य

मुंबई | नगर सह्याद्री राज्यातील शेतकरी, घरकुल लाभाथ आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसुली...

महापालिकेचे उत्पन्न वाढणार; इमारती, घरांच्या बांधकाम क्षेत्राच्या नोंदीत धक्कादायक बाबी उघड

४७ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण / नागरिकांनी सर्वेक्षणास आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे : आयुक्त...