spot_img
अहमदनगरधक्कादायक! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; डोक्यात घातला दगड; अहिल्यानगर मधील घटना..

धक्कादायक! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; डोक्यात घातला दगड; अहिल्यानगर मधील घटना..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
चारित्र्यावर संशय घेऊन झालेल्या गैरसमजांमुळे मोठमोठे गुन्हे झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये महिलांविरोधात घरगुती हिंसाचारांच्या अनेक घटनांची नोंद देखील राज्यात झाली आहे. मात्र,अहिल्यानगर मधील राहुरी तालुक्यातील नुकत्याच झालेल्या एका घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून डोक्यात दगडाने जबरदस्त मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. सदरची घटना दि. 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. मंदा नारायण चव्हाण असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून जखमी महिलेचा भाऊ भगवान दादाराव जाधव ( रा. वाघोली, पुणे ) यांनी फिर्याद दिली असून आरोपी पती नारायण बाजीराव चव्हाण, हरीभाऊ बाजीराव चव्हाण, रुख्मिणी बाजीराव चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नारायण चव्हाण याने त्याची पत्नी मंदा नारायण चव्हाण हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घातला. त्यावेळी पती पत्नी मधील वाद अगदीच विकोपाला गेला. तेव्हा आरोपी नारायण याने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केला. नंतर मोठा दगड घेऊन पत्नीच्या डोक्यात मारला. त्यानंतर आरोपी घराला बाहेरुन कडी लावून पसार झाला.

त्यानंतर सायंकाळी 5 वाजेच्या जखमी महिलेचे मुले शाळेतून घरी आल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलांनी दार उघडून घरात गेलो असता आईला मारहाण झालेली असून डोक्यातून रक्त येत असल्याचे मामा भगवान दादाराव जाधव यांना कळवले. त्यानंतर त्यांनी शेजारच्या लोकांना बोलवून ताबडतोब दवाखान्यात नेण्याचे भाचीला फोनवरून सांगीतले. त्यानंतर शेजार्‍यांनी मंदा हिस प्रथम राहुरी ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी नेले.

मात्र, ती गंभीर जखमी असल्याने तिला नगर येथील जिल्हा रूग्णालयात व तेथून पुणे येथील ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिस पथकाने काल दि. 26 नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान आरोपी नारायण बाजीराव चव्हाण याला सोनई येथून, आरोपी हरीभाऊ बाजीराव चव्हाण याला पुणे येथून तर आरोपी रुख्मिणी बाजीराव चव्हाण हिला राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...