spot_img
ब्रेकिंगबाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी...

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीने पोलिस चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपी लीलावती रुग्णालयामध्ये गेला होता. जवळपास अर्धा तास तो रुग्णालयामध्ये होता. बाबा सिद्दिकी यांच्या वाचण्याची शक्यता कमी असल्याचे कळताच तो रुग्णालयातून बाहेर पडला आणि पळून पुण्याला गेला.

मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार गौतम हा बाबा सिद्दिकी यांचे निधन झाल्याची खात्री करण्यासाठी लीलावती रुग्णालयात गेला होता. जवळपास ३० मिनिटं शिवकुमार गौतम लीलावती रुग्णालयाजवळच होता. बाबा सिद्दिकी यांची तब्बेत अत्यंत चिंताजनक असून वाचण्याची शक्यता धूसर असल्याची खात्री पटल्यानंतरच शिवकुमार तिथून निघून गेला. त्यानंतर रिक्षाने तो कुर्ल्याला गेला तिथून ठाण्याला लोकलने गेला आणि ठाण्यावरून एक्स्प्रेसने पुण्याला रवाना झाला.

मोबाईलवर बातम्यांमधून शिवकुमारला बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूची बातमी समजली. गोळीबारानंतर शिवकुमारने शर्ट बदली केला आणि घटनास्थळी देखील तो जवळपास २० मिनिटं तमाशा बघत होता. प्लॅनिंगनुसार शिवकुमार हा धर्मराज कश्यप आणि गुरमैल सिंह या दोन शूटरला उज्जैन रेल्वे स्थानकात भेटणार होता. ज्याठिकाणी बिश्नोई गँगमधील माणसं त्यांना वैष्णव देवीला नेणार होते. मात्र दोघेही घटनास्थळी पकडले गेले होते. रविवारी यूपी एसटीएफच्या मदतीने उत्तर प्रदेशच्या बेहराईचवरून त्याला अटक करण्यात आली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...

आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, नेमकं प्रकरण काय पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर...

धक्कादायक ! डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा PM रिपोर्ट आला पण…’या’ प्रश्नांचं गूढ अद्याप कायम

सातारा / नगर सह्याद्री - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा...

बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम; पारनेरचे भूमिपुत्र आंदोलनात दाखल

पारनेर / नगर सह्याद्री - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी...