spot_img
अहमदनगरधक्कादायक! दिराने वहिनीला संपवल! दारुच्या नशेत असं काय घडलं..

धक्कादायक! दिराने वहिनीला संपवल! दारुच्या नशेत असं काय घडलं..

spot_img

Maharashtra Crime: मावस दिराने दारूच्या नशेत वहिनीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजू शंकर कातोरे (वय ५४) यास अटक केली आहे. जिजाबाई शिवराम खोडके (वय ४५) असे मयत महिलेचे नाव आहे.

उंचखडक बुद्रुक शिवारात गुरुवारी (दि.२०) रोजी रात्री दहाच्या नंतर सदरची घटना घडली. उंचखडक बुद्रूक शिवारात भाऊसाहेब आनंदा देशमुख यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांच्या शेतात काम करणारे मजूर राजू शंकर कातोरे, त्याची मावस वहिनी जिजाबाई शिवराम खोडके व जिजाबाई हिचा २४ वर्ष वयाचा मुलगा फिर्यादी सुनील शिवराम खोडके (मूळ गाव बोराचीवाडी गर्दणी ) हे एकत्र राहत होते.

राजू यास दारूचे व्यसन आहे. गुरुवारी जिजाबाई व राजू हे आठवडे बाजाराला अकोलेस गेले होते. मुलगा सुनील गर्दणीला गेला होता. बाजाराहून आल्यानंतर गुरुवारी रात्री जिजाबाई व राजू दोघेच घरी होते. दोघांमध्ये जोराचे भांडण झाले. भाऊसाहेब देशमुख यांचा मुलगा संजय याने भांडण सोडवले व तो घरी निघून गेला.

जिजाबाई हिचा खून झाल्याची बाब पहाटे लक्षात आली. राजू याने दारूच्या नशेत लोखंडी उलथनी, लोखंडी रॉड याच्या साह्याने मारहाण केल्याने जिजाबाई हिचा खून झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी राजू यास अटक केली. मयतचा मुलगा सुनील याच्या फिर्यादीवरून राजू कातोरे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...