spot_img
अहमदनगरशनिशिंगणापूर देवस्थानचा धक्कादायक निर्णय! 'त्या' कर्मचाऱ्यांना डच्चू, कारण आले समोर...

शनिशिंगणापूर देवस्थानचा धक्कादायक निर्णय! ‘त्या’ कर्मचाऱ्यांना डच्चू, कारण आले समोर…

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानाने एक मोठा निर्णय घेत १६७ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, यामध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनियमितता आणि शिस्तभंगाच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आल्याचे मंदिर ट्रस्टने स्पष्ट केले. मात्र, या निर्णयामागे हिंदू संघटनांनी गेल्या काही दिवसांपासून केलेला दबाव आणि आंदोलन कारणीभूत असल्याचे दिसते.

गेल्या काही दिवसांपासून शनिदेवाच्या मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद वाढला होता. २१ मे २०२५ रोजी मुस्लिम कारागिरांनी मंदिराच्या पवित्र व्यासपीठावर ग्रिल बसवणे आणि स्वच्छता-रंगरंगोटी केल्याने हिंदू संघटना आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र आक्षेप नोंदवला होता.

यानंतर सकल हिंदू समाजाने १४ जून रोजी मंदिराबाहेर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता, ज्यामुळे ट्रस्टवर सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्याचा दबाव वाढला. मंदिर ट्रस्टने यापूर्वी स्पष्टीकरण देत सांगितले होते की, ११४ मुस्लिम कर्मचारी शेती, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षणाशी संबंधित विभागांत कार्यरत होते, कोणीही गर्भगृह किंवा चबुतऱ्यावर काम करत नव्हते.

यापैकी ९९ कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून अनुपस्थित होते, तर १५ कर्मचारी २० वर्षांहून अधिक काळ सेवा देत होते. तरीही, हिंदू संघटनांच्या आंदोलनाच्या दबावामुळे ट्रस्टने सर्व ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांसह १६७ कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने अहिल्यानगर परिसरात खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळा नदीपात्रातून बेसुमार वाळूतस्करी

| देसवडे, मांडवे खुर्द, वासुंदे, पळशी परिसरात वाळूतस्करांचा उच्छाद | पोलिसांच्या नाकावर टिच्चून टाकळी...

पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’; आ. दाते यांच्या विजयानंत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश..

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी...

आडतेबाजारातील ‘ती’ कारवाई थांबवा; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील आडते बाजार, दाळमंडई, तेलीखुंट, जुना दाणे डबरा, वंजार गल्ली, तपकीर...

सरपंच, उपसरपंचाला शिवीगाळ, ग्रामस्थावर प्राणघातक हल्ला; नगर तालुक्यातील ‘या’ गावात धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- घोसपुरी (ता. अहिल्यानगर) येथील स्मशानभूमीत झाडे लावण्याच्या कामादरम्यान सरपंच किरण साळवे...